1) उत्पन्न ठरवा -
प्रथम आपला Income source किंवा घरात महिन्याला किती पैसा येतो ते लिहा.
- Salary
- भाड्यातून उत्पन्न
- तुमचे दुसरे side income
- व्यवसायिक उपन्न
2) खर्चांची यादी करा .
प्रत्येक महिन्यात तुमचे खर्च सारखे राहणार नाहीत. तरी तुमच्या महिन्याचा सर्व खर्च लिहून काढा. खर्च हे दोन प्रकारचे असतात.
A) गरजेचे खर्च :
- आरोग्य आणि औषधं
- पाणीबील, विजबील, Internet bill
- मुलांचे शाळेचे खर्च
- किराणा सामान
- घरभाडे / गृहकर्ज
B) निम्मे गरजेचे किंवा टाळता येतील असे खर्च :
- सिनेमा ट्रिप्स
- Branded products
- बाहेर खाणं
- Online shopping
यावरून तुम्हाला समजेल की, कुठे खर्च करायचे आणि कुठे वाचवायचे.
3) बचतीसाठी ठरावीक रक्कम ठेवा.
महिन्याची सुरुवात होताच ठरवा की किती रक्कम बाजूला ठेवायची.
उदा . Income तुमची ₹ 25,000 असेल तर किमान ₹ 2,000 ते 4,000 ची बचत करा.
पण हे सहज बिना बजेटच ताळमेळ बसवणं होत नाही. हि बचत यासाठी उपयोगी ठरते :
- आरोग्य खर्च
- भविष्यातील गुंतवणूक
- आपत्कालीन गरज
घरगुती मासिक बजेट - उदाहरण
उत्पन्नाचे स्रोत | रक्कम (₹) |
---|---|
नोकरीचा पगार | 30,000 |
फ्रीलान्सिंग | 5,000 |
इतर (भाडे/तासांटी) | 2,000 |
एकूण उत्पन्न | ₹37,000 |
खर्चाचे प्रकार | रक्कम (₹) |
---|---|
घरभाडं | 10,000 |
खाद्यपदार्थ | 6,000 |
विज/पाणी/गॅस | 2,000 |
वाहतूक | 1,500 |
मोबाईल/नेट | 1,000 |
सेव्हिंग / गुंतवणूक | 5,000 |
इतर खर्च | 3,000 |
एकूण खर्च | ₹28,500 |
शिल्लक बचत | ₹8,500 |
---|
4) loan किंवा EMI यासाठी नियोजन
आत्ताच्या काळामध्ये तरुणाईला credit card चा लोभ दाखवला जातो. पण जर credit card चे वेगवेगळे charges माहित असणे गरजेचे आहे. जर कोणत्या प्रकारचे कर्ज असेच किंवा EMI असेल तर तो वेळेवर भरणे गरजेचे आहे. नाहीतर CIBIL score बिघडू शकतो. बजेटमध्ये ह्यालाही जागा द्या. तुम्ही जर उशीर कराल तर व्याज वाढेल.
5) बजेट लिहून ठेवा
प्रत्येक महिन्याचे खर्च, उत्पन्न, बचत हे सर्व एका वहित, मोबाईल मध्ये किंवा Excel शीटमध्ये लिहून ठेवा. बजेट बनवण्यासाठी खालील स्टेप्स :
1) टेबल तयार करा एका बाजूला तुमचे किती मार्गांनी उत्पन्न आणि किती येते त्याची यादी करा शेवटी त्याची एकूण रक्कम लिहा.
2) दुसऱ्या बाजूला तुमचे किती मार्गांनी पैसे खर्च होतात आणि किती याची यादी करा, शेवटी त्याची Total लिहा.
3) आता एकूण उत्पन्नातून एकूण खर्च वजा केले तर जी रक्कम भेटेल ती तुमची बचत असेल.
असे केल्याने दर महिन्याला काय बदल होतो ते समजते, हि गोष्ट नोंदवा. यामुळे पुढचे बजेट अजून strong होईल.
6) कुटुंबाची मदत घ्या
बजेट बनवणे फक्त घरात कर्ता असलेल्या व्यक्तीचे काम नसावे, तर ते घरातील प्रत्येकाचे असावे त्यामुळे प्रत्येकाचा सल्ला द्या.
घरातील प्रत्येक सदस्याच्या गरजा महत्त्वाच्या आहेत. हे लक्षात घेऊन उर्वरीत खर्च कसा कमी करता येईल याची चर्चा करा. जेव्हा सर्वजण सहमत होऊन सहकार्य करतात तेव्हाच budget परिपूर्ण होते.
7) बजेट बनवण्यासाठी सोपे मार्ग :-
जर तुम्हाला बजेट मोबाइलवर त्वरीत बनवायचे आहे तर खालील APPS तुमच्या कामी येतील. जे playstore वर उपलब्ध आहेत.
- Money Manager Expense & Budget
- Mymoney - Track expense & Budget
- Monefy - Budget & Expense App.
- Goodbudget - Budget & Finance
- Spending Tracker.
माझ्याकडून तुमच्यासाठी काही खास टिप्स :
1) शक्यतो shopping mall किंवा supermarket मध्ये जात असताना एक यादी बनवा. आणि त्यानुसारच खरेदी करा. यामुळे अनावश्यक खरेदी टळेल.
2) शक्य होईल तितके UPI चा वापर टाळा. आणि Cash चा वापर करा. कारण आपण किती खर्च करतोय याच भान राहील.
3) आता प्रत्येक ठिकाणी share market, Cryptocurrency किंवा SIP करण्यासाठी विविध APPS ची जाहिरात येते त्याला भुलू नका.
4) पूर्वी अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा होत्या पण प्रगती होईल तशी गरज वाढत गेली. तसेच तुमचे Income वाढत जाईल तसेच तुमची गरज वाढेल. हि संकल्पना वेगळी आहे ना.
5) सुरक्षित असणारा गुंतवणुकीची मार्ग निवडा. एकाच Income source वर न राहता त्याचे मार्ग वाढवा. हिच गोष्ट Coronavirus ने 2023 मध्ये सगळ्या जगाला सांगितली. आता AI आला व लोकांच्या नोकऱ्या खाऊ लागला. तर विचार करा भविष्यात अजून काही नवीन येऊन आपल्यावर हल्ला करेल, याची चिंता आहे.
निष्कर्ष :-
बजेट असल्याने पैसा कुठे जातो हे समजते. सुरुवात साध्या पद्धतीने करा, नंतर सवय लागेल. घर चालवताना बजेट ठरवणे गरजेच आहे ते ठरलं की आर्थिक चिंता कमी होते. आणि भविष्य सुरक्षित होते.
तुमच बजेट तयार करा आणि शिस्तबद्ध जीवन जगा !
Comments
Post a Comment