Skip to main content

मुलगी मोठी झाली. तिच्या लग्नाचा विचार करताय? पण खर्च, हे पर्याय बघा आजच!





 जशी मुलं मोठी होतात तशी महागाई पण वाढत जाते. सामान्य कुटुंबामध्ये मुलांच्या लहानपणापासूनच त्यांच्या चांगल्या भविष्यासाठी तुम्ही पैसे जमा करता, पण पुढे जाऊन त्यांच्या शाळा आणि कॉलेजचा खर्च या मध्ये ती savings संपून जाते. पुढे जाऊन त्यांच्या लग्नाच्या वेळेस मोठं आर्थिक संकट उभे राहते. घरातलं मोठं शुभ कार्य म्हणजे मुलीचं लग्न, आता लग्न थाटामाटात होणे घरातील प्रत्येकाची इच्छा असते. सजावट, पाहुण्यांची व्यवस्था, दागिने, जेवण, कपडे व इतर खूप गोष्टी याचा एकत्र खर्च लाखात जातो.                                  पण घाबरायचे नाही, योग्य नियोजन आणि वेळीच घेतलेले निर्णय कधीच तुम्हाला अडचणीत आणणार नाहीत. हा blog तुमच्या ह्या समस्येवर इलाज सांगणार आहे. प्रत्येकाला आपल्या आवडीप्रमाणे लग्न करण्याचा अधिकार आहे. ह्या लेखामध्ये फक्त माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.

1) संकल्प करा लग्न म्हणजे खर्चाचं प्रदर्शन नाही!
                               सगळ्यात आधी तुमची mentality बदला, लग्न म्हणजे दोन व्यक्ती आणि दोन कुटुंबांना नात्यात बांधणारा सोहळा आहे. समाज काय म्हणेल यापेक्षा आर्थिक क्षमता लक्षात घेवून कसे निर्णय घेणे हे गरजेचे आहे.
2) लग्न म्हणजे देखावा नको :- 
                              लग्न म्हणजे Prestige project नाही, की कर्ज काढून समाजात नाव होण्यासाठी 1000 लोक खाऊ घालण्यापेक्षा 50 लोकांचं पण साधं मनापासून केल तरी सुंदर होतं. नुस्ती हवा करायची काय गरज असती, बर तुम्ही अडचणीत कधी सापडतात माहितेय जेव्हा मोठ पुढारी नायतर एखादा Actor/ Actress बोलवता. त्यांना शाही बैठक व्यवस्था, चांगल जेवण, त्यांना बघायला आलेल्या लोकांची गर्दी यांची व्यवस्था आणि अतिथीला मानधन किंवा सप्रेम भेट साधं देऊन चालत नाही. आणि मजेची गोष्ट म्हणजे सगळे आलेल्या पाहुण्याला महत्त्व देतात, सगळे तिकडेच गर्दी करत्यात पण ज्यांचं लग्न हाय तेच  नवरा - नवरी त्यांच्याकडे कोण बघतच नाय. खरतर त्यांना महत्त्व दिले पाहिजे त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा दिवस आणि क्षण हाय. मुख्य अतिथी म्हणुन लग्नात येण्याचे ते खुप पैसे घेतात आणि उगीचच रुबाब दाखवतात. म्हणून त्यांना लग्नात आणणे टाळा, अति करतात ते.
3) कमी Budget मध्ये साधं आणि सुंदर लग्न कसं करू शकतो?
-  घरगुती कार्यक्रम करा -
                           मोठा Hall किंवा मोठा मंडप तर मोठा खर्च, त्यामुळे हि संकल्पना तुम्हाला कशी वाटते बघा - (आपल्या दारात मंडप घालून साधं लग्न + Court marriage + नंतर Reception). हि संकल्पना नक्कीच पैसे वाचवते. आणि Event manager कडे जाऊ नका, नातेवाईकांकडे काम वाटू शकता. शुभ कार्यात सगळे एकजूट होतात.



-  Photographer and cinematographer :



                                 लग्न म्हणाल्यावर आठवणी तर हवीच, तुमचे जवळचे किंवा लांबचे नातेवाईक आणि मित्र मंडळी खूप दिवसांनी भेटता गप्पा मारता या सुखी क्षणांचे Photos videos किंवा album हवा. पण महागडा photographer न निवडता local photographer जो कमी पैसे घेत असेल त्याला काम द्या. हे आता pre - wedding च नव लफड आलय, समाजात, नातेवाइकांच्या समोर उगाच मोठा screen लावून दोघांचा Romance आणि वेडेवाकडे चाळे दाखवून आम्ही modern आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न असतो. wastern culture follow करणे बंद करा. लग्नात drone वापरणे, गरजेपेक्षा जास्त फटाके वाजवून लग्नात जवळचे वातावरण दुषित करू नका आणि decoration मध्ये fire machine वापरू नका, कारण याच्यामुळे लग्नात अपघात झाल्याचे खूप वेळा ऐकायला मिळते.
                     त्यामुळे सुरक्षिततेचा ही विचार करा. जिथे परंपरा, संस्कृती आणि संस्काराला महत्त्व नाही तिथे सफल लग्न नाही. लग्न हे सुंदर क्षणांची आठवण असावी. समाजात दिसणारा cinema नको. 
4) सरकारच्या योजना -
                   अश्या काही योजना असतात ज्या खूप कमी लोकांना माहित असतात. त्या योजनांची योग्य माहिती घेण्यासाठी राज्य सरकारची official website आहे " Aaple Sarkar" इथे सर्व योजनांची माहिती मिळेल. https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en
1) सुकन्या समृद्धी योजना -
                        मुलगी 18 वर्षांखालील असेल तर भविष्यासाठी या योजनेचा लाभ घ्या. फक्त मध्यमवर्गीय मुलींसाठी                         
-  दरवर्षी थोडी गुंतवणुक
-  7 % पेक्षा जास्त व्याज
-  उच्च शिक्षणासाठी सुद्धा वापर
पण जर मुलीच लग्नाचं वय असेल तर खालील योजना बघा :-
2) मुख्यमंत्री कन्यादान योजना -
          हि योजना राज्य सरकारची आहे. ह्या योजनेचे फायदे
-  गरीब व मध्यमवर्ग साठी
-  25,000 ते 50,000 पर्यंत मदत मिळू शकते
-  अधिक माहिती साठी महिला व बालकल्याण विकास कार्यालयात भेट दया.  

 


5) कर्ज घ्या, पण योग्य विचाराने -
-  बँकेकडून सर्वांत आधी सल्ला घ्या. बँकेकडून ही काही विशिष्ट योजनेची माहिती मिळू शकते. महत्त्वाचे म्हणजे सावकार टाळा.
6) मुलीशी मोकळेपणाने बोला -
                 लग्नात होणारा खर्च मुलीला समजावून सांगा. मुलीला आर्थिक परिस्थितीची जाणीव असायला हवी. जर त्यांच्या मनाप्रमाणे लग्न झाल नाय तर, तुम्ही बातमी वाचत असाल बायकोने आपल्या नवऱ्याला प्रियकरासोबत मिळून मारले किंवा नवऱ्याने बायकोला तिच्यासाठी मारले. असे का होते तर काही गोष्टींचा खुलासा केलेला नसतो. त्यामुळे मुलगा असो किंवा मुलगी त्यांच्याशी मोकळेपणाने बोलले पाहिजे.
7) खास टिप्स -
                   माझ्याकडून तुमच्यासाठी खास टिप्स आहेत.
1) पहिले लग्नामध्ये आहेर दिले जायचे पण आता आहेर नाय तर बाहेरून चांगले  packing करून आतमध्ये स्वस्तातले गिफ्ट दिले जाते. पण लग्नात खास पाहुणे बोलावून ते तुम्हाला पैसे देतील ते कसे हे खालील Tip वाचा.
2) लग्नाची रौनक वाढवायची असेल तर परदेशातील काही नागरिक तुमच्या लग्नात सामील होतात. लग्न समारंभ enjoy करतात. त्याबदल्यात लग्न join करण्याचे तुम्हाला भरपुर पैसे देतात. हे नागरिक एक Traveller असतात. त्यांना भारतीय संस्कृती, परंपरा खूप आवडत असते. त्यांना बोलावण्यासाठी www.joinmywedding.com घ्या website वर जाऊन तुम्ही त्यांना Invitation देऊ शकता. इथे ते verity केले जातात.

Conclusion -
             कमी खर्चात केले ल लग्न हे पण सुंदर होत. लग्नानंतर मुलीचं जीवन आनंदी असणं गरजेचं आहे, पैशाचा थाटमाट नव्हे. शक्य होईल तितक्या सरकारी योजनांकडे लक्ष द्या.



Comments

Popular posts from this blog

घर चालवताना महिन्याचं बजेट कसं तयार करावं?

.                        तुम्ही व्यवसाय करीत असाल किंवा नोकरी करत असाल. तर महिन्यांचं बजेट बनवणे खुप गरजेचे आहे. त्याशिवाय आर्थिक संतुलन राहणार नाही. आता बजेट म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे झाले तर येणाऱ्या पैशांचं आणि खर्चाचे नियोजन. बजेट केल्याने काय होते तर  घरामधील योग्य खर्च आणि अयोग्य खर्च हे समजून खर्च टाळता येतो. आता योग्य व अयोग्य खर्च कसा ओळखायचा आणि बजेट कसं तयार करायचं हे या लेखामध्ये जाणून घेवूया. 1) उत्पन्न ठरवा -                          प्रथम आपला Income source किंवा घरात महिन्याला किती पैसा येतो ते लिहा. -  Salary -  भाड्यातून उत्पन्न -  तुमचे दुसरे side income -  व्यवसायिक उपन्न 2) खर्चांची यादी करा .         प्रत्येक महिन्यात तुमचे खर्च सारखे राहणार नाहीत. तरी तुमच्या महिन्याचा सर्व खर्च लिहून काढा. खर्च हे दोन...

गावाकडून शहरात आलो, आता पैसे साठवायचे कसे?

     "स्वप्न बघायला आलोय ... पण आता खरं जीवन सुरू झालंय!"                                  प्रत्येकजण आपलं स्वप्न पुर्ण करण्यासाठी गाव सोडून शहरात येतो. काहीजण शिक्षण पूर्ण करण्यासाठी तर काही नोकरीसाठी येतात. शहरात आल्यावरच शहराची वास्तविकता कळते.                            गावाकडे जशा स्वस्त गोष्टी भेटतात, तसे शहरात नाही. खूप महागाई आहे, सततचे खर्च, घरभाडे यात महिन्याच्या अखेरीस काहीच शिल्लक उरत नाही. गावाकडे सर्वांचा असा समज असतो की, माणूस गावाकडून शहरात गेला की, खूप पैसा कमावणार आणि Standard of living सुधारणार, पण गावाकडे राहून सुद्धा आपण सुधारणा करू शकतो.            मग तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की, स्वतःचे गाव सोडून मी शहरात आल...