"स्वप्न बघायला आलोय ... पण आता खरं जीवन सुरू झालंय!"
प्रत्येकजण आपलं स्वप्न पुर्ण करण्यासाठी गाव सोडून शहरात येतो. काहीजण शिक्षण पूर्ण करण्यासाठी तर काही नोकरीसाठी येतात. शहरात आल्यावरच शहराची वास्तविकता कळते.
गावाकडे जशा स्वस्त गोष्टी भेटतात, तसे शहरात नाही. खूप महागाई आहे, सततचे खर्च, घरभाडे यात महिन्याच्या अखेरीस काहीच शिल्लक उरत नाही. गावाकडे सर्वांचा असा समज असतो की, माणूस गावाकडून शहरात गेला की, खूप पैसा कमावणार आणि Standard of living सुधारणार, पण गावाकडे राहून सुद्धा आपण सुधारणा करू शकतो.
मग तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की, स्वतःचे गाव सोडून मी शहरात आलोच आहे आता पैसे कसे साठवू?
ह्या प्रश्नाचे उत्तर ह्या blog मध्ये तुम्हाला नक्की भेटणार. जे शहरात नवीन आहेत व संघर्ष करत आहेत. तर सर्व गोष्टींचा आनंद घेत आणि smartly जगायचंय तर हा लेख वाचा.
🌟 सुरुवात स्वतः पासून करा - "बचत ही सवय आहे, जादू नव्हे!"
गावाकडे असताना पैसे वाचायचे पण शहरात आल्यावर पैसे कुठे जातात समजत नाही, असे तुमच्यासोबत होत असेलच. कारण नवीन नवीन शहरात आल्यावर खूप आकर्षक गोष्टी दिसतात. शहरात आल्यावर लगेचच Branded products and clothes, बाहेरचं खाणं, नवीन मोबाईल घेणं, Pub/ night club, shopping mall मध्ये सतत जाऊन खर्च करणे तुम्हाला भविष्यात फटका मारू शकते. लक्षात ठेवा आजची बचत तुमचे भविष्य सुरक्षित करते.
![]() |
Photo by rosario fernandes |
- संकल्प करा -
दर महिन्याला पगारातील किमान 20 - 30% बचत करायची.
- विचार बदला -
उरले तर बचत करेन, त्याऐवजी साठवून उरले तर खर्च करीन.
Monthly Budget -
खर्चाचं रहाटगाडगे नियंत्रित करा -
बिना बजेटचे बचत करणे सोपे नाही. बजेट म्हणजे आर्थिक नियोजन कुठे, किती पैसा खर्च करायचा हे बजेट ठरवतं. बजेट कसं बनवायचं यावर मी लेख लिहिला आहे. तो blog नक्की वाचा
Simple Budget Example -
खर्च प्रकार टक्केवारी
1) घरभाडे 30%
2) जेवण 20%
3) Mobile recharge 15 %
4) प्रवास खर्च 15%
5) इतर खर्च 20%
---------------------------------------------------------------------------------------------------------
बजेट बनवा - बजेट बनवण्यासाठी नोटबुक किंवा Mobile App याचा वापर करा.
खर्च Track करा - रोजचा खर्च लिहा रोज खर्चावर नियंत्रण राहील.
Cash Envelope तंत्र - जुनं पण यशस्वी -
शहरात राहत असताना सगळे खर्च नियंत्रणाबाहेर जात असतील तेव्हा ही पद्धत उपयोगी पडते.
1) घरभाडे, मोबाईल खर्च, जेवण, प्रवास हे वेगळे खर्चाचे लिफाफा तयार करून प्रत्येकात ठराविक पैसे ठेवा.
2) नंतर महिनाभर खर्चासाठी त्या लिफाफा मधून पैसे काढून खर्च करा. लिफाफा संपला की खर्चाचे मार्ग संपले.
पण personally हि पद्धत मला नाय आवडली. लिफाफा करून पैसे त्यात ठेवले आणि envelope चोरी झाले तर, बजेटचे लागतील... फटके!
घर, प्रवास आणि जेवण - या 3 गोष्टींत शहाणपणा दाखवा -
1) घरभाडे वाचवा -
- एकटं रूममध्ये राहण्यापेक्षा तुमच्या मित्रांसोबत रूम शेअर करा.
- तुमच्या Job location जवळच घर निवडा.
2) घरगुती जेवण ठेवा मुख्य आधार -
- घरगुती जेवण निवडा खर्च कमी होतो. बाहेरचं खाणं खिसा रिकामा करतो.
- स्वतःच जेवण बनवत असशील तर एक नंबर, खुप पैसे वाचतील वाघाचे
![]() |
Photo by Shardar Tarikul Islam |
3) Public Transport ने प्रवास करा -
- City bus, local, metro याने प्रवास स्वस्तात होईल.
- OLA/ Uber तुमचं पाकिट मोकळं करेल.
काळजी करण्याची गरज नाही. फक्त Smart खर्च करा.
- Online shopping असो किंवा offline shopping याला limit असावे.
- मोठा खर्च आला तर त्याला 30 दिवस Hold करून ठेवा. कारण आपण
त्यासाठी पैसे उपलब्ध करू शकतो.
बचतीचे साधे पर्याय -
1) Recurring Deposit (RD) -
- प्रत्येक महिन्याला 1000 - 2000 बँकेत जमा
- 1 वर्षात मोठी रक्कम तयार
2) SIP (Systematic Investment Plan) -
- दर महिन्याची गुंतवणुक तेही Mutual fund मध्ये
- 500 पासुन सुरू करा.
- long term साठी योग्य
3) Digital UPI - Piggy Bank -
- Gpay, Phonepe किंवा इतर UPI ॲप्स मध्ये Piggy Bank ची system असते. पण नावे वेगवेगळी असू शकतात.
- छोट्या रकमेतून सुरू करा अगदी प्रत्येक दिवसाला 10 - 20 रुपयांपासून.
UPI Apps मध्ये आणखीन वेगवेगळ्या schemes असतात. जिथे तुम्हाला चांगले interest मिळू शकते, ते तपासा.
🆘 Emergency Fund - गरज पडल्यावर देवासारखा भासतो -
शहरात कधीही, कोठेही, काहीही होऊ शकते.
- अचानक नोकरी जाणं
- गावाला जाण्याची गरज
- अचानक आजार आणि बरेच काही
• आपला भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यावर control नाही. कधी काय होईल सांगता येत नाही. त्यामुळे Emergency Fund ठेवा.
• त्या Fund साठी वेगळे बँक खाते ठेवा. जर तुम्हाला PF मिळत असेल तर त्याला सुद्धा Emergency Fund म्हणूनच वापरा.
➡️ काही खास Tips -
माझ्याकडून तुमच्यासाठी खास टिप्स :-
- गावाकडून शहरात गेल्यावर लगेच शहराची हवा नाय लागून द्यायची. इथं नाद लावणाऱ्या लय गोष्टी हायत.
- गावात असताना निर्व्यसनी होतास आता व्यसन करतोयस तर एका चक्रात अडकून राहशील, इथे व्यसन करण सुद्धा महाग हाय.
- मित्रा स्वतःला Machoman किंवा कुल बॉय बनवण्याच्या नादाला लागू नको. जसा आहेस तसा best आहेस. Physical look याला महत्त्व नायतर पोटाची भूक याला महत्त्व द्या.
![]() |
Photo by Sourabh Narwade |
- शहरात काही मुली अश्या भेटतात की तुला वाटेल हिच्या सारखी सुंदर व निर्मल मनाची पोरगी जगात नाय. पण हा शुध्द दिखावा हाय. महत्त्वाचे म्हणजे Company मध्ये काम करताना तिथल्या पोरीला तुझा mobile no. देऊ नकोस. त्यांच्यापासून दूर रहा, ह्या पोरींच्या मुळे पोरं बरबाद होतात.
- शहरात सगळे गोड बोलतात पण त्यांच्या तोंडावर fraud लिहिलेल नसते.
- शहरात काही मुली सुरुवातीला मुलावर प्रेम करत्यात नंतर त्याला blackmail करून पैसे काढून घेतात सावध रहा.
- Online earning कडे लक्ष द्या. Freelancing करा त्यामुळे extra income मिळत राहील.
हे सगळे मंत्र तुम्हाला शहरात बिनधास्त राहण्यासाठी मदत करतील.
Conclusion -
तुम्ही तुमचे कुटुंब आणि गाव सोडून आलात तर बचत करणे ही गरज नाही तर जबाबदारी आहे.
Comments
Post a Comment