Skip to main content

Smart लोक खर्च कसा सांभाळतात - तुम्हीही शिका

 

Photo by Pixabay

                                  महिन्याच्या शेवटी पगार झाल्यावर दोन प्रकारची लोक दिसतात. एक जे महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा करून बसतात आणि दुसरे जे smartly बचत करतात. पैसे कमावणं आणि त्याचा योग्य पद्धतीने वापर करणे खुप महत्त्वाचं आहे. अस्थिर पैशाला स्थिर ठेवणे आणि खर्चाला फाटा फुटू नये यावर आपला ताबा पाहिजे.
1) खर्चाची नोंद ठेवणे -
                         Smart लोक एका गोष्टीची आयुष्यात शिस्त लावून घेतात, ती म्हणजे प्रत्येक खर्चाची ती छोटी असो किंवा मोठी त्याची लिस्ट बनवतात. Snacks, online shopping, tea/ coffee हे सगळं लिहून ठेवलं की, खर्च कुठे आणि कसा होतो हे लक्षात येते.
2) बचत आधी, खर्च नंतर -
                               महिन्याचा पगार येण्या अगोदरच आपण खर्चाचं फालतू planning करतो हे चुकीच आहे. पगार झाला की लगेच saving account बचतीची रक्कम टाका. पगारासाठी वेगळे आणि बचतीसाठी वेगळे Bank account ठेवा. गुंतवणुक हा पर्याय तुम्हाला अडचणींच्या काळात वाचवत राहतात. मग ह्या सगळ्यातून उरलेले पैसे खर्च करा.
                          1) बचत + 2) गुंतवणुक + 3) खर्च
                       ह्या पायऱ्यांचा वापर करून तुम्ही आयुष्य शिस्तबद्ध करू शकता. बजेट बनवून त्याचा कायम वापर करा.
3) फालतू Subscription कट करा.

Image by yousafbhutta from Pixabay


                                  दिवसेंदिवस OTT platforms वाढत आहेत. आपल्याला त्यांचे monthly plan परवडणारे वाटत असले तरी auto payment मुळे महिन्याला तुमच्या account मधून नकळत पैसे कट होतात. त्यामुळे auto-pay हा option बंद करा. नको असलेल्या subscriptions बंद करा. Smart लोक OTT Apps चा वापर कमीत कमी करतात. 
4) ऑनलाइन साधनांचा वापर -
                                       खर्च manage करण्यासाठी बजेटचा वापर करावाच लागतो. त्यासाठी तज्ञांची गरज नाही. फक्त playstore वर जाऊन expense tracker किंवा money manager सर्च करा आणि verified apps वापरा. UPI टाळा आणि Cash वापरा. Online shopping करताना तुम्ही नवीन वस्तु पाहता पण तुम्हाला तुमच्या घरातील नको असलेली वस्तू विकायची असेल तर तुम्हाला मार्ग सापडत नाही. यामध्ये तुम्हाला pskvibe.com हि वेबसाईट मदत करेल अगदी free इथे तुम्ही जाहिरात post करू शकता.
5) शहाणपणाने खरेदी -
                         Smart लोकांना माहितेय नवीन वस्तु महाग तर जुनी वस्तु स्वस्त दरात मिळते. प्रत्येक platforms वर जाऊन तुम्ही price compare करा आणि चांगली वस्तु खरेदी करा.
Conclusion -
                        Smart खर्च = Smart future
                                तुमच्या खर्चाला जसे खूप दरवाजे आहेत. तसेच तुमच्या income चे दरवाजे उघडा. एकाच income वर अवलंबून राहू नका. Smart लोकांचा मंत्र - बचत आणि खर्च यासाठी smart आणि शिस्तबद्ध बना.

Comments

Popular posts from this blog

घर चालवताना महिन्याचं बजेट कसं तयार करावं?

.                        तुम्ही व्यवसाय करीत असाल किंवा नोकरी करत असाल. तर महिन्यांचं बजेट बनवणे खुप गरजेचे आहे. त्याशिवाय आर्थिक संतुलन राहणार नाही. आता बजेट म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे झाले तर येणाऱ्या पैशांचं आणि खर्चाचे नियोजन. बजेट केल्याने काय होते तर  घरामधील योग्य खर्च आणि अयोग्य खर्च हे समजून खर्च टाळता येतो. आता योग्य व अयोग्य खर्च कसा ओळखायचा आणि बजेट कसं तयार करायचं हे या लेखामध्ये जाणून घेवूया. 1) उत्पन्न ठरवा -                          प्रथम आपला Income source किंवा घरात महिन्याला किती पैसा येतो ते लिहा. -  Salary -  भाड्यातून उत्पन्न -  तुमचे दुसरे side income -  व्यवसायिक उपन्न 2) खर्चांची यादी करा .         प्रत्येक महिन्यात तुमचे खर्च सारखे राहणार नाहीत. तरी तुमच्या महिन्याचा सर्व खर्च लिहून काढा. खर्च हे दोन...

मुलगी मोठी झाली. तिच्या लग्नाचा विचार करताय? पण खर्च, हे पर्याय बघा आजच!

 जशी मुलं मोठी होतात तशी महागाई पण वाढत जाते. सामान्य कुटुंबामध्ये मुलांच्या लहानपणापासूनच त्यांच्या चांगल्या भविष्यासाठी तुम्ही पैसे जमा करता, पण पुढे जाऊन त्यांच्या शाळा आणि कॉलेजचा खर्च या मध्ये ती savings संपून जाते. पुढे जाऊन त्यांच्या लग्नाच्या वेळेस मोठं आर्थिक संकट उभे राहते. घरातलं मोठं शुभ कार्य म्हणजे मुलीचं लग्न, आता लग्न थाटामाटात होणे घरातील प्रत्येकाची इच्छा असते. सजावट, पाहुण्यांची व्यवस्था, दागिने, जेवण, कपडे व इतर खूप गोष्टी याचा एकत्र खर्च लाखात जातो.                                  पण घाबरायचे नाही, योग्य नियोजन आणि वेळीच घेतलेले निर्णय कधीच तुम्हाला अडचणीत आणणार नाहीत. हा blog तुमच्या ह्या समस्येवर इलाज सांगणार आहे. प्रत्येकाला आपल्या आवडीप्रमाणे लग्न करण्याचा अधिकार आहे. ह्या लेखामध्ये फक्त माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. 1) संकल्प करा लग्न म्हणजे खर्चाचं प्रदर्शन नाही!     ...

गावाकडून शहरात आलो, आता पैसे साठवायचे कसे?

     "स्वप्न बघायला आलोय ... पण आता खरं जीवन सुरू झालंय!"                                  प्रत्येकजण आपलं स्वप्न पुर्ण करण्यासाठी गाव सोडून शहरात येतो. काहीजण शिक्षण पूर्ण करण्यासाठी तर काही नोकरीसाठी येतात. शहरात आल्यावरच शहराची वास्तविकता कळते.                            गावाकडे जशा स्वस्त गोष्टी भेटतात, तसे शहरात नाही. खूप महागाई आहे, सततचे खर्च, घरभाडे यात महिन्याच्या अखेरीस काहीच शिल्लक उरत नाही. गावाकडे सर्वांचा असा समज असतो की, माणूस गावाकडून शहरात गेला की, खूप पैसा कमावणार आणि Standard of living सुधारणार, पण गावाकडे राहून सुद्धा आपण सुधारणा करू शकतो.            मग तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की, स्वतःचे गाव सोडून मी शहरात आल...